आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोडांवर मोठ्या प्रमाणात पक्षातंराचे वारे वाहू लागले आहे. भाजपात सध्या पक्षप्रवेश करणाऱ्याची संख्या जास्त आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा  भाजपात सामील झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया यावेळी जयाप्रदा यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयाप्रदा समाजवादी पक्षाकडून रामपूर मतदार संघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. अभिनेत्री जयाप्रदा यावेळी भाजपाकडून आपले नशीब अजमावणार आहे. भाजपाचे दिग्गज नेता नेपाल सिंह यांचे वाढते वय आणि आजारपणामुळे त्यांच्या जागी भाजपाला ठोस उमेदवार हवा होता. आता जयाप्रदा यांच्या आगमानामुळे भाजपाची चिंता मिटल्याची चिन्हे आहेत. समाजवादी पक्षाचे आजम खान यांच्याविरोधात जयाप्रदा लढणार आहेत.

जयाप्रदा २००४ आणि २००९ मध्ये रामपूरमधून खासदार म्हणून संसदेत गेल्या आहेत. दोन्ही वेळेस जयाप्रदा यांनी काँग्रेसच्या बेगम नूर बानो यांचा पराभव केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor and former mp jaya prada joins bharatiya janata party
First published on: 26-03-2019 at 13:21 IST