26 February 2021

News Flash

अद्रमुक नेत्या सुलोचना संपत यांचे निधन

तामिळनाडू प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष इ.व्ही.के.एस एलंगोवन यांच्या मातोश्री व अद्रमुकच्या नेत्या सुलोचना संपत यांचे अल्प आजाराने येथे निधन झाले.

| June 7, 2015 04:20 am

तामिळनाडू प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष इ.व्ही.के.एस एलंगोवन यांच्या मातोश्री व अद्रमुकच्या नेत्या सुलोचना संपत यांचे अल्प आजाराने येथे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. सुलोचना या अद्रमुकच्या सचिव होत्या. त्यांना आठ दिवसांच्या उपचारानंतर घरी पाठवण्यात आले होते. एलंगोवन यांच्याशिवाय त्यांना इनियान संपत, गोथामन व मथिवानन व कन्या अनबेझिल ही मुले आहेत. सुलोचना या तामिळनाडू काँग्रेसचे नेते इ.व्ही.के.संपत यांच्या पत्नी होत्या. अद्रमुक नेत्या व मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या निधनाने अद्रमुकचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी महिलांच्या समान हक्कांसाठी मोठा लढा दिला, असे जयललिता यांनी सांगितले. तामिळनाडू काँग्रेस समिचीनेही त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 4:20 am

Web Title: veteran aiadmk leader sulochana sampath passes away
Next Stories
1 घुसखोरीच्या प्रयत्नात तीन अतिरेकी ठार
2 ‘भाजप-पीडीपीत समन्वयाचा अभाव’
3 गोव्यात बलात्काराच्या ‘किरकोळ घटना’ घडणारच!
Just Now!
X