मोहाली येथील स्थानिक रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेले भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना विनंतीवरून रविवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांची पत्नी निर्मल कौर यांना करोनामुळे आयसीयूत हलविण्यात आले आहे. कौर या भारताच्या व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार होत्या.

हेही वाचा – जबरदस्त क्रिकेट कारकीर्द असूनही क्रिकेटच्या देवाला वाटतेय ‘या’ दोन गोष्टींची खंत!

फोर्टिस हॉस्पिटल सांगितले, की कुटूंबाच्या विनंतीवरून मिल्खा सिंग यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यांना ऑक्सिजनचा आधार देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे, मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल यांना आयसीयूमध्ये हलवावे लागले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

हेही वाचा – स्वित्झर्लंडचा १९ वर्षीय मोटो-३ रायडर जेसन डुपास्कियरचा अपघाती मृत्यू

करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ९१ वर्षीय मिल्खा बुधवारपासून चंडीगढ येथील निवासस्थानीच विलगीकरणात होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.