23 January 2021

News Flash

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन

सौमित्र चटर्जी यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे सौमित्र चटर्जी यांना लाइफ स्पोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रविवारी ( १५ नोव्हेंबर) दुपारी १२.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सौमित्र चटर्जी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ६ ऑक्टोबर रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचारानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर कोव्हिड एन्सेफॅलोपॅथी आणि कॉम्पिकेशन्समुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावली. सौमित्र चटर्जी यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कोण आहेत सौमित्र चटर्जी?

सौमित्र चटर्जी हे बंगाली कलाविश्वातील एक नावाजलेलं नाव होतं. त्यांनी १९५९ मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास १४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे फ्रान्समधील सर्वात मानाचा Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचसोबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आलं होतं. इतकंच नाही तर ३ वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार , ७ फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 1:03 pm

Web Title: veteran bengali actor soumitra chatterjee passes away fans and celebs mourns ssj 93
Next Stories
1 अमित शाह यांनी बोलावली तातडीची बैठक, करोना स्थितीचा घेणार आढावा
2 “अवघ्या ४० जागा असताना नितीशकुमार मुख्यमंत्री कसे होऊ शकतात?”
3 भारतातील करोनाबाधितांचा ८८ लाखांचा टप्पा पार
Just Now!
X