विश्व हिंदू परिषद आणि गुजरातचे ‘संघनिष्ठ’ मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात फूट पडत असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे. पोलिसांमार्फत परिषदेत दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप विहींपने मंगळवारी केला आह़े या संदर्भात विहिंपने पोलीस आयुक्तांना कायदेशीर नोटीसही पाठविली आह़े गेल्या वीस वर्षांपासून वापरात नसलेल्या विहिंपच्या कार्यालयावर पाच पोलीस अधिकारी थडकल्यामुळे संतप्त होऊन विहींप ने ही कार्यवाही केली आह़े
कोणतीही पूर्वसूचना न देता १९ एप्रिल रोजी काही पोलीस विहिंपच्या जुन्या कार्यालयात शिरल़े गेली २० वर्षे ते कार्यालय बंद असल्याचे माहीत असूनही आमच्या वाहन चालकाच्या पत्नीला प्रश्न विचारून भंडावून सोडण्यामागे काय कारण होते, असा प्रश्न विहिंपने केला आह़े या पूर्वी एका प्रसंगात विहिंप कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला गुन्हेगारी खटल्यात गोवल्याच्या तसेच प्रविण तोगडिया यांना गुजरात पोलिसांकडून धमकीचे पत्र पाठविल्याच्या प्रसंगांचाही या नोटीशीत उल्लेख आह़े
नरोडा पाटीया दंगलीतील माया कोडनानी, बाबू बजरंगी आणि इतरांची फाशी टाळणयासाठी प्रयत्न केल्यानेच आम्हाला घाबरविण्याचे प्रयत्न होत असल्याचेही नोटीशीत म्हटले आह़े आम्हाला आमच्या एकाही कार्यकर्त्यांच्या जीवास कोणताही धोका झाल्यास गुजरात शासन आणि पोलीसच त्याला सर्वस्वी जबाबदार राहतील, असेही नोटीशीत नमूद करण्यात आले आह़े
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 1:43 am