23 January 2020

News Flash

Article 370 : मित्राची अवस्था बघून विहिंपचा नेता हळहळला

कलम ३७० हटवण्यात यावे ही आमचीही भूमिका होती. पण या मार्गाने नव्हे.

(संग्रहित छायाचित्र)

कलम ३७० हटवल्यानंतर पूर्वपदावर येण्यासाठी धडपडत असलेल्या काश्मीर खोऱ्यातील एक अनपेक्षित आणि हळवा प्रसंग समोर आला. दक्षिण काश्मीरमधील एका शासकीय विश्रामगृहाबाहेर विश्व हिंदू परिषदेचा नेता नजरकैदेत ठेवलेल्या आपल्या मित्राला भेटू देण्यासाठी सुरक्षा रक्षकांना हात जोडत होता. देशाला मजबूत बनवायचे तर खुशाल बनवा पण माणुसकीच्या मार्गाने करा, अशी विनवणी करताना हा नेता भावूक झाला.

अमृतसर येथील विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असलेले राकेश खन्ना हे सीआरपीएफ छावणीचे स्वरूप आलेल्या दक्षिण काश्मीरमधील एका शासकीय विश्रामगृहाबाहेर थांबलेले आहेत. कारण त्यांचा मित्र हदवाडा बाजार समितीचे माजी अध्यक्ष एजाज अहमद सोफी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार कलम ३७० रद्द करण्यात आले. हा निर्णय घेण्यापूर्वी काश्मीरमध्ये पक्षनेत्यांसह अनेकांना ताब्यात घेऊन विविध ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यात एजाज अहमद सोफी यांचाही समावेश आहे. खन्ना हे किराणा आणि कपड्यांचे व्यापारी आहेत असून त्यांच्या आजोबांपासून काश्मीरातील व्यापारी संबंध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा बैठकीत सोफी यांच्यासोबतचा फोटो दाखवत खन्ना म्हणाले, सोफी हे माझे २९ वर्षांपासून मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसारखे आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचारही केला. विशेष म्हणजे अमृतसरमध्ये झालेल्या कपड्यांच्या प्रदर्शनातील स्टॉल सोफी यांनी उधळवून लावला होता, अशी आठवण खन्ना यांनी सांगितली.

सोफी यांना नजरकैदेत ठेवण्याच्या निर्णयावर खन्ना म्हणाले, कलम ३७० हटवण्यात यावे ही आमचीही भूमिका होती. पण या मार्गाने नव्हे. मुख्य प्रवाहातील नेत्याशिवायही नेते आहेत. सरकारने त्यांच्यांशी बोलायला हवे होते. ते सगळ्यांना अटक करत आहेत. देशाला मजबूत करायचे तर करा. त्याला माझा विरोध नाही. पण माणुसकीच्या मार्गाने काम करायला हवे ना? निष्पाप लोकांना का तुरूंगात डांबताय. हे चुकीचे आहे. दूरध्वनी सेवा बंद केली. सर्व बाजारपेठ बंद आहे. लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. अमरनाथ यात्रेकरूंनाही का परत पाठवले, असा सवाल खन्ना यांनी केला. सोफी भेटू द्यावे म्हणून खन्ना सुरक्षा रक्षकांशी वारंवार हात जोडत होते.

सोफी यांची पत्नी रूकईया यांनी माझ्याकडे मदत मागितली. त्यानंतर एका कारने मी श्रीनगरला पोहोचलो. सोफी यांची पत्नी आणि मुले त्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्यांना भेटू दिले जात नाही. त्यांचा मुलगा दिल्लीत आयएएस परीक्षेची तयारी करीत आहे. दोन मुली श्रीनगरमध्ये शिकत आहे. सोफी मला माझ्या भावासारखे आहे. ते सामाजिक कार्यकर्ते आहे. त्यांची पत्नी आजारी आहे. सोफी यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कुणाला दुखावलेले नाही. काही वर्षांपूर्वी श्रीनगरमध्ये झालेल्या आंदोलनात त्यांनी घोषणा दिल्या होत्या. ती क्लिप आता पुन्हा समोर आली आहे. पण जर कुणी घोषणा देत असेल तर त्यात वाईट काय आहे. कोण अशा घोषणा देत नाहीत, असा संताप खन्ना यांनी व्यक्त केला.

First Published on August 25, 2019 1:22 pm

Web Title: vhp leader got emotional after watching kashmiri friend bmh 90
Next Stories
1 कलम ३७० हटवल्यानंतर मोदींची पहिलीच ‘मन की बात’
2 अरुण जेटली यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात
3 Video : ‘छोट्या शालेय मुलांनाही पकडतात’, राहुल गांधींसमोर कैफियत मांडताना काश्मिरी महिलेला कोसळलं रडू
Just Now!
X