भारताचे पुढचे नौदल प्रमुख म्हणून शनिवारी व्हाईस अॅडमिरल करमबीर सिंह यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. करमबीर सिंह विद्यमान नौदल प्रमुख सुनील लांबा यांची जागा घेतील. सुनील लांबा ३१ मे रोजी निवृत्त होणार आहेत. करमबीर सिंह सध्या विशाखापट्टणम येथे पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत.

करमबीर सिंह यांनी पुणे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पदवी घेतली. १९८० साली ते नौदलात दाखल झाले. १९८२ साली ते हेलिकॉप्टरचे वैमानिक बनले. त्यांना चेतक आणि कामोव हेलिकॉप्टर उड्डाणाचा अनुभव आहे. नौदलातील ३९ वर्षाच्या सेवेत त्यांनी वेगवेगळया जबाबदाऱ्या यशस्वीपणे निभावल्या आहेत.

Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?

मागच्या महिन्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर भारतीय नौदल लगेच शत्रूचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले होते. पुलवामा हल्ल्याच्यावेळी भारतीय नौदलाचा सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु होता. परिस्थिती बदलताच भारतीय नौदल लगेचच पाकिस्तानी नौसेनेला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले होते. दहशतवादाचे बदलते स्वरुप लक्षात घेता समुद्रीमार्गातही आव्हाने आहेत. मुंबईवर २६/११ चा हल्ला करणारे दहशतवादी समुद्रमार्गानेच आले होते. त्यामुळे करमबीर सिंह यांच्यासमोरही वेगवेगळी आव्हाने असणार आहेत.