News Flash

उपराष्ट्रपती नायडू यांच्या ट्विटर खात्याला पुन्हा ‘ब्लू टिक’

नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यालाही  ब्लू टिक देण्यात आला होता.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्ल्यू टिक’वरून शनिवारी गोंधळ उडाला. ट्विटरने नायडू यांच्या वैयक्तिक खात्यावरील  ब्लू  टिक काढून टाकली होती, मात्र त्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा  ब्लू  टिक देण्यात आली.

खात्रीशीर, विश्वासनीय आणि सक्रिय असलेल्या ट्विटरखात्याबद्दल अन्य वापरकत्र्यांना आश्वास्त करण्यासाठी ट्विटरकडून ब्ल्यू टिक म्हणजेच  ब्लू व्हेरिफाइच बॅच दिला जातो.

नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यालाही  ब्लू टिक देण्यात आला होता. मात्र तो हटविण्यात आल्याचे शनिवारी निदर्शनास आले. त्याबद्दल सरकार आणि भाजपने नाराजी व्यक्त केली, त्यावर जोरदार टीकाही झाली आणि त्यानंतर ट्विटरने त्यांना पुन्हा  ब्लू टिक दिली. उपराष्ट्रपती झाल्यापासून नायडून उपराष्ट्रपतींच्याच हॅण्डलचा वापर करीत आहेत, त्यांच्या वैयक्तिक हॅण्डलचा वापर होत नसल्याने ब्लू टिक काढून टाकण्यात आली असावी, असे सांगण्यात येत आहे.

नियम काय

ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचे नाव बदलले गेले असेल किंवा एखादे खाते सक्रिय नसेल, अद्ययावत होत नसेल तर ते अनव्हेरिफाइड केले जाते आणि  ब्लू टिक हटविली जाते. एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर  ब्लूू टिक असेल मात्र नंतर त्याने कार्यालय सोडले असेल आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील तर ब्लू टिक हटविली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:19 am

Web Title: vice president venkaiah naidu tweet blue tick akp 94
Next Stories
1 तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी दिल्ली सज्ज
2 देशात दिवसभरात १.२० लाख जणांना करोनाची लागण, ३३८० जणांचा मृत्यू
3 सरसंघचालकांच्या ट्विटर खात्याबाबतही तेच!   
Just Now!
X