News Flash

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ ऑगस्टला

१८ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार

राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच गुरुवारी निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १८ जुलैपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून आवश्यकता भासल्यास ५ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची कारकिर्द १० ऑगस्टरोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. आवश्यकता भासल्यास ५ ऑगस्टरोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाईल असे झैदी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद तर काँग्रेसप्रणित यूपीएकडून मीरा कुमार रिंगणात आहे. आता उपराष्ट्रपतीसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देत मोदींनी सर्वांनाच धक्का दिला होता. भाजपने दलित उमेदवार दिल्याने काँग्रेसनेही मीरा कुमार यांना रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना बहुमत मिळण्याची चिन्हे असून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही भाजपचेच पारडे जड आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 11:50 am

Web Title: vice presidential elections 2017 election commission of india declares schedule polls will be held on august 5 bjp congress
Next Stories
1 … अशा पद्धतीने तुमच्या पॅन कार्डला आधार क्रमांक जोडा
2 सहा मुस्लिमबहूल देशांमधील नागरिकांना ‘या’ अटींवरच मिळणार अमेरिकेचा व्हिसा
3 ‘जीसॅट-१७’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण