27 October 2020

News Flash

बलरामपूरमधील पीडितेचाही मृत्यू

२२ वर्षीय दलित महिलेवर दोन जणांनी बलात्कार केला होता आणि तिला गंभीर जखमीही केले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

 

हाथरसनंतर उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील बलात्कार पीडितेचाही मंगळवारीच मृत्यू झाला. या २२ वर्षीय दलित महिलेवर दोन जणांनी बलात्कार केला होता आणि तिला गंभीर जखमीही केले होते.

बलरामपूरमध्ये २२ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांनी तिचे पाय तोडले आणि पाठीलाही गंभीर दुखापत केल्याचा आरोप तिच्या आईने केला, मात्र पोलिसांनी त्याचा इन्कार केला.

महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी आपली मुलगी गेली होती. घरी परतत असताना तीन-चार जणांनी तिचे अपहरण केले आणि तिला त्यांच्या खोलीवर नेले, तेथे तिला इंजेक्शन देण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला ई-रिक्षातून घरी पाठविण्यात आले आणि तिच्या घराबाहेर तिला फेकण्यात आले. आरोपींनी तिचे पाय तोडले आणि पाठीलाही गंभीर दुखापत केली. ती उभी राहू शकत नव्हती आणि बोलू शकतही नव्हती, असे पीडितेच्या आईने सांगितले.

दोन आरोपींना अटक

मंगळवारी सायंकाळी ही महिला गंभीर अवस्थेत घरी परतली ते पाहून कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात हलविले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला, असे बलरामपूरचे पोलीस अधीक्षक देव रंजन वर्मा यांनी सांगितले. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शाहीद आणि साहील या आरोपींना ओळखले आणि त्यांना अटक केली. तिचे पाय तोडण्यात आले होते का, असे विचारले असता शवविच्छेदन अहवालात तसा उल्लेख नसल्याचे वर्मा म्हणाले. तिच्या पार्थिवावर बुधवारी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अन्त्यसंस्कार करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:36 am

Web Title: victim also died in balrampur abn 97
Next Stories
1 चांदोबाचे चित्रकार के. सी. शिवशंकर कालवश
2 ब्रेग्झिट विधेयकावरून ‘ईयू’ची ब्रिटनविरुद्ध कायदेशीर कारवाई
3 कारखान्यांबाबत गुजरातच्या अधिसूचना रद्द
Just Now!
X