News Flash

VIDEO: काँग्रेस नेत्याने अफजल गुरूच्या नावामागे ‘जी’ उपाधी लावल्याने वादंग

सुरजेवाला म्हणाले की, भारतीय राज्यघटनेवर आमचा विश्वास नसता तर सर्व कायदेशीर पर्याय आजमवल्यानंतर आम्ही अफजल गुरूला फाशी दिली नसती

या विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विजेत्या पक्षांचे अभिनंदन केले आहे, असेही सुर्जेवाला यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत अफजल गुरूच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख केल्याने नवा वादंग निर्माण झाला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी सुरजेवाला यांच्याकडून ही पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना सुरजेवाला यांनी अफजल गुरूच्या नावामागे ‘जी’ अशी उपाधी लावली. सुरजेवाला म्हणाले की, भारतीय राज्यघटनेवर आमचा विश्वास नसता तर सर्व कायदेशीर पर्याय आजमवल्यानंतर आम्ही अफजल गुरूला फाशी दिली नसती. दरम्यान, या प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर आपण चुकीमुळे तसे बोलून गेल्याचे स्पष्टीकरण देत रणदीप सुरजेवाला यांनी दिलगिरी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2016 5:35 pm

Web Title: video congress leader addresses afzal guru as ji
टॅग : Congress
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड आणि मुंबई स्वच्छतेत अव्वल; मोदींचे वाराणसी ६५व्या स्थानी
2 देशद्रोहाला पाठिंबा हीच काँग्रेसच्या राष्ट्रवादाची नवी व्याख्या आहे का?- अमित शहा
3 ‘जेएनयू’तील देशद्रोही विद्यार्थ्यांना गोळ्या घाला- साक्षी महाराज
Just Now!
X