15 August 2020

News Flash

Video: बिबट्यानं घरात शिरून पळवला पाळीव कुत्रा

हा थरारक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे

बिबट्यानं पळवला पाळीव कुत्रा

कर्नाटकमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक बिबट्या एका घराचे कुंपण ओलांडून अंगणात शिरतो आणि घरातील पाळीव कुत्र्याची शिकार करताना दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेच हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथे घडलेला हा थरारक घटनाक्रम १४ सप्टेंबरचा असल्याचे समजते. बिबट्या घराभोवती असणाऱ्या कुंपणाच्या काही फूट उंच भितींजवळ येऊन थांबतो. त्यानंतर उडी मारुन तो आतमध्ये शिरतो. थोडावेळ हा बिबट्या घराच्या अंगणामध्ये भटकतो. काही वेळाने तो तोंडात आपली शिकार म्हणजेच घरातील पाळवी कुत्रा घेऊन कुंपणाच्या त्याच भिंतीवरुन उडी मारुन बाहेर येताना या व्हिडिओत दिसतो. हा थरारक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हा व्हिडिओ एएनआयने पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बिबट्या वसाहतीमध्ये शिरलेला नाही तर मनुष्य त्यांच्या परिसरात शिरला असून त्याने तेथे घरे बांधली आहेत,’ असं मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले आहे. कर्नाटकमध्ये अशाप्रकारे घरामध्ये शिरुन पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याची ही काही पाहिलीच वेळ नाही. याआधीही जानेवारी महिन्यामध्ये हुलीयुर्दूरला गावात बिबट्याने घराच्या अंगणात प्रवेश करुन कुत्र्याची शिकार केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 11:45 am

Web Title: video leopard enters karnataka home runs away with pet dog scsg 91
Next Stories
1 सहा महिन्याची शिक्षा तिही फुटबॉल पाहण्यासाठी; तिने कोर्टातच केले आत्मदहन
2 शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर नेटकरी संतापले; #PappuThackeray हॅशटॅग वापरुन झाले व्यक्त
3 रानू मंडल यांच्यानंतर उबर चालकाचंही गाणं व्हायरल
Just Now!
X