ट्रेनने प्रवास करताना नेहमी भिकारी भीक मागताना दिसतात, विशेष म्हणजे पॅसेंजर ट्रेनमध्ये तर ही सामान्य गोष्ट आहे. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, हा व्हिडीओ पाहून लोकं चांगलेच हैराण होतायेत. कारण या व्हिडीओमध्ये विमानाच्या आत एक भिकारी आलेला पाहायला मिळतोय.

माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या कराचीहून बॅंकॉकला जाणाऱ्या विमानातील ही घटना आहे. व्हिडीओत दिसणारा भिकारी हा पाकिस्तानचा नागरीक आहे आणि तो कराची येथे विमानात चढला, असं सांगितलं जातंय. पण पाकिस्तानने तो आमचा नागरीक नाहीये असं सांगितलं आहे. पाकिस्तानमधील एका न्यूज चॅनलने तो पाकिस्तानी नाही तर इराणी नागरीक असल्याचा दावा केला आहे. पण पाकिस्तानच्या या दाव्यावर सोशल मीडियाच्या युजर्सना अजिबात विश्वास बसत नाहीये. दुसरीकडे एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असताना तो भिकारी विमानात आलाच कसा याबाबत लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

भिकारी विमानातील दोन्ही बाजूला असलेल्या सीटच्या मधोमध उभा असलेला पाहायला मिळतोय. त्याला पाहून विमानातील हवाईसुंदरी त्याच्याजवळ जाते आणि त्याच्याशी काहीतरी बोलते. दोघांमध्ये काय चर्चा होते हे व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकायला येत नाही. त्यानंतर तेथे विमानातील एक पुरूष कर्मचारीही येतो आणि त्या भिकाऱ्याची चौकशी करतो, दरम्यान पुरूष कर्मचाऱ्याला तो भिकारी काही कागदपत्रंही देताना दिसतोय. हा सर्व प्रकार घडत असताना विमानातील सहप्रवाशांमध्ये मोठा हास्य कल्लोळ उडाल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. विमानातीलच एका प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करुन फेसबुकवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर येताच व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ –