News Flash

‘त्यांचा बापही मला अटक करु शकत नाही..’,रामदेवबाबांचा व्हिडिओ व्हायरल

योगगुरु रामदेवबाबा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत

योगगुरु रामदेवबाबा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. करोना काळात योग गुरू रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबा यांना अशी विधाने न करण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशननेही रामदेवबाबांविरोधात आवाज उठविला आहे.

आयएमएने पतंजली संस्थापक रामदेवबाबा यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी डॉक्टरांनी देखील रामदेवबाबा आणि पतंजलीचा निषेध केला. सोशल मीडियावरही रामदेवबाबांविरोधात एक मोहीम सुरू आहे. रामदेवबाबा यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या जात आहेत.

दरम्यान, रामदेवबाबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून देखील रामदेवबाबा यांच्यावर टीका होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते आपल्या अटकेवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले, “अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही.” हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विट करुन नेटकऱ्यांनी रामदेवबाबा यांना लक्ष्य केले आहे.


रामदेवबाबा म्हणाले, लोक कधीकधी रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात. चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोकं जो ट्रेंड चालवितो तो देखील शीर्षस्थानी असतो.

रामदेवबाबा यांच्या या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी केंद्र सरकारलाही ट्रोल केले आहे. स्वामी रामदेव हे भाजप आणि पंतप्रधान यांच्या जवळचे असल्यामुळे, असे वक्तव्य करीत आहेत, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2021 12:19 pm

Web Title: video of ramdev baba goes viral on social media srk 94
Next Stories
1 Coronavirus: लसीकरण प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नका, कारण…; केंद्र सरकारचा इशारा
2 या फोटोत पुढे दिसणारे दोघे वैज्ञानिक तर मागून चालणारे देशातील सर्वोच्च नेते, कारण वाचून थक्क व्हाल
3 करोनाची लस घेण्यासाठी तरुणाला चोपले?, हरभजनने व्यक्त केला संताप
Just Now!
X