27 September 2020

News Flash

VIDEO: इम्रान खानला भेटायला आलेल्या कुवेती अधिकाऱ्याचे पाकिस्तानी ऑफिसरने चोरले पाकीट

कुवेती प्रतिनिधी हे पाकिस्तान-कुवेत संयुक्त मंत्रिस्तरीय मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला आले होते.

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पाकिस्तानी अधिकारी कुवेतच्या प्रतिनिधीचे पाकिट चोरताना दिसतोय.

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पाकिस्तानी अधिकारी कुवेती शिष्टमंडळातील प्रतिनिधीचे पाकीट चोरताना दिसतोय. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी (दि. २८) आरोपी अधिकाऱ्याकडून कुवेती दिनारने भरलेले पाकीट जप्त केले आहे. कुवेती प्रतिनिधी हे पाकिस्तान-कुवेत संयुक्त मंत्रिस्तरीय मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला आले होते.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, बैठकीत सहभागी झालेले कुवेतचे प्रतिनिधी जेव्हा हॉल बाहेर गेले. ते आपले पैशाने भरलेले पाकीट टेबलवरच विसरले होते. त्याचवेळी गुंतवणूक आणि सुविधाचे संयुक्त सचिव जर्रार हैदर खान तिथे आले. त्यांना कुवेती प्रतिनिधीचे पैशांचे पाकीट दिसले. त्यांनी ते लगेचच गूपचुप आपल्याकडे ठेवले. कुवेती प्रतिनिधीने पाकीट चोरीला गेल्याची तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी सर्व सत्य समोर आले.

पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने भारतीय वृत्त वाहिनीला सांगितले की, बैठकीला आलेल्या उद्योग आणि अर्थ व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा हे प्रकरण माहीत झाले तेव्हा त्या सर्वांना याचा धक्का बसला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. देशातील अधिकाऱ्यांसाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आरोपी जर्रार खानला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या कृत्यामुळे पाकिस्तानची मान आंतरराष्ट्रीय समुदायासमोर खाली गेली असून जगभरात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 3:34 am

Web Title: video pakistani bureaucrat caught on camera stealing kuwaiti delegates wallet
Next Stories
1 टेस्ट ट्युबद्वारे सिंहाच्या छाव्यांचा जन्म, जगातील पहिलाच यशस्वी प्रयोग
2 Video : …म्हणून सेरेना विल्यम्सने टॉपलेस होऊन गायले गाणे
3 Video : आनंद महिद्रांनी ट्विट केलेला ‘चायनिज गरबा’ डान्स पाहाच!
Just Now!
X