चंपारण सत्याग्रहाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी बिहारच्या मोतिहारी येथे होते. भाषणाची सुरूवात मोदींनी भोजपूरी भाषेत केली मात्र, भाषण करताना मोदींनी महात्मा गांधींचं चुकीचं नाव घेतलं. भाषण करताना मोदी म्हणाले, ”बिहारने मोहनलाल करमचंद गांधी यांना महात्मा बनवलं, त्यांना बापू बनवलं”. खरंतर महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं आहे. पण पंतप्रधान चुकून मोहनलाल म्हणाले.

मोदींच्या या भाषणाचा व्हिडीओ कॉंग्रेस नेता गौरव पंधी यांनी ट्विट केला आहे. ‘बिहारमध्ये मोदींनी पुन्हा महात्मा गांधींना मोहनलाल करमचंद गांधी म्हटलं. राष्ट्रपिताचं नाव माहीत नसलेले ते (मोदी) देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, की त्यांनी असं जाणूनबुजून केलं. ५ वर्षाच्या चिमुकल्यालाही माहिती आहे की गांधीजींचं नाव मोहनदास करमचंद गांधी होतं’. असं ट्विट त्यांनी केलं. अशाप्रकारची चुकी मोदींकडून पहिल्यांदाच झालेली नाही, तर अनेकदा त्यांनी गांधीजींचं नाव घेतना चूक केली आहे असा आरोपही कॉंग्रेसच्या या नेत्याने केला आहे. ‘कदाचित पंतप्रधान हे आपल्या चुकांमधून बोध न घेणारे मूर्ख आहेत किंवा ते जाणुनबुजून असं करतात, आणि मीडिया त्यांच्यासाठी ढालीप्रमाणे काम करते’ असं गौरव पंधी म्हणाले.

गौरव यांच्या ट्विटनंतर लोकांनी पीएम मोदींची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. नितीन सिन्हा नावाच्या एका युझरने लिहीलं…’महात्मा गांधींचं पूर्ण नाव माहिती नसणं हा शिक्षणाचा फरक आहे. नथुरामचं नाव विचारलं तर संपूर्ण खानदानाचं नाव सांगतील हे लोकं’. तर अन्य एका युझरने ‘हा भारताच्या इतिहासातून गांधींना हटवण्याचा प्रकार आहे’ असं म्हटलं.

पाहा व्हिडीओ आणि ट्विटरवरील प्रतिक्रिया-