News Flash

Video : महिलेला मारहाण, झाडाला बांधून केस कापले

मारणाऱ्यांमध्ये पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सहभागी झाल्या होत्या.

राजस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेत महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तिला झाडाला बांधून ठेवल्याचे आणि तिचे केस कापण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. मारणाऱ्यांमध्ये पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सहभागी झाल्या होत्या. शेजाऱ्यांनीसुद्धा तिला मारहाण केली. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी राजस्थानमधील अजमेर जवळ ही घटना घडली. ही घटना जेथे घडली तेथून काही किलोमीटर अंतरावरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात राजस्थानच्या मुख्यामंत्री वसुंधरा राजे सहभागी झाल्या होत्या. आंबेडकर कांची वस्तीत राहणाऱ्या या महिलेचे अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध असल्याचा आरोप आहे. गावकऱ्यांनी तिला घरातून फरफटर बाहेर काढून मारहाण काली. नंतर तिचे केस कापून तिला एका झाडाला बांधून ठेवल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजते. या महिलेच्या वर्तनाचा गावातील मुलांवर वाईट परिणाम होत असल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे. दोन मुलांची आई असलेल्या या महिलेला पतीने सोडून दिले आहे. दोन महिला आपापसात भांडत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली. प्रकार काही वेगळाच असल्याचे नंतर समजल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस उभे राहून तमाशा पाहात असल्याचा पोलिसांवरदेखील आरोप होत आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करत असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. उदयपूरमध्ये अलिकडेच घडलेल्या एका घटनेत महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली होती. तिच्यावरदेखील अनेक पुरुषांशी संबंध ठेवल्याचा आरोप होता.

जगायला नालायक असणाऱ्यांना करोना होतो, मुळात हा रोगच नाही - संभाजी भिडे

पुरस्कारांनी भरलेला 'खिसा'; दिग्दर्शक आणि लेखक यांच्याशी खास गप्पा
करोना आधी संपणार की व्यापारी?; बॅनर्स घेऊन पुण्यातील व्यापारी रस्त्यावर
Next Stories
1 महिलांनी बुरखा जाळून साजरा केला इसिसपासून मुक्ततेचा आनंद!
2 दलितांचा संघ जिंकायला लागल्यामुळे कबड्डीच्या सामन्याला हिंसक वळण
3 श्री श्री रविशंकर यांच्या सोहळ्यामुळे यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्राची गंभीर हानी; तज्ज्ञ समितीचा अहवाल
Just Now!
X