23 October 2019

News Flash

व्हिडिओ: ओबामा ऑन द डान्स फ्लोअर

बराक ओबामा यांनी काही दिवसांपूर्वीच अलास्का येथे स्वत:च्या नृत्य कौशल्याची झलक पेश केली.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काही दिवसांपूर्वीच अलास्का येथे स्वत:च्या नृत्य कौशल्याची झलक पेश केली. एरवीही ओबामा हे अशाप्रकारचे आश्चर्याचे धक्के देण्यासाठी आणि उत्स्फुर्त नृत्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ओबामांनी आपल्या याच लौकिकाला जागत अलास्का येथील शाळकरी मुलांसोबत नृत्य केले. अलास्कातील एका पारंपरिक नृत्यावर नाचणाऱ्या ओबामांच्या हालचाली यावेळी पाहण्यासारख्या होत्या. नृत्यासाठी पारंपरिक वेषात सजलेली लहान मुले आणि त्यांच्या जोडीला नाचणारे ओबामा असे मजेशीर दृश्य याठिकाणी उपस्थितांना पहायला मिळाले. या नृत्यानंतर ओबामांनी आनंद व्यक्त करताना पुढीलवेळी याठिकाणी येताना मला माझी पत्नी मिशेल आणि मुलींना आणायला आवडेल, असे म्हटले.

First Published on September 5, 2015 6:02 pm

Web Title: video when obama tapped his feet to a native alaskan dance with children