News Flash

व्हिडिओकॉन प्रकरणी प्राप्तिकर विभागाची दीपक कोचर यांना नोटीस

आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचे ते पती आहेत

संग्रहित छायाचित्र

प्राप्तिकर विभागाने व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी दीपक कोचर यांना नोटीस पाठवली आहे. दीपक कोचर हे आयसीआयसीआय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती आहेत. प्राप्तिकर अधिनियम कलम १३१ अन्वये ही नोटीस जारी करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नोटीस पाठवून कोचर यांना त्यांच्या वैयक्तिक आर्थिक बाबींची माहिती, मागील काही वर्षांची विवरण पत्रे सादर करण्यात सांगण्यात आली आहेत. प्राप्तिकर विभागाने व्हिडिओकॉन कंपनी आणि त्याच्याशी निगडीत लोकांची आर्थिक चौकशी सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

याप्रकरणी आणखी काही जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या सर्वांच्या उत्तरावर कारवाई केली जाईल. याप्रकरणाशी निगडीत सीबीआयने म्हटले आहे की, प्राथमिक तपासासाठी दीपक कोचर यांना चौकशीसाठी लवकरच बोलावले जाऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 7:14 am

Web Title: videocon icici bank loan matter deepak kochar income tax notice chanda kochar
Next Stories
1 शाळा अर्धवट सोडलेल्या त्रिश्नितचा फोर्ब्सच्या यादीत समावेश
2 माकडांपासून सुटकेसाठी तब्बल ३० कोटींची योजना
3 सर्वात दूर असणाऱ्या ताऱ्याचा ‘नासा’कडून शोध
Just Now!
X