05 March 2021

News Flash

आणीबाणीचे वादग्रस्त साथीदार

विद्याचरण शुक्ला हे नाव लोकांच्या मनात पोहोचले ते आणीबाणीच्या कालखंडात. अर्थात त्या नावाचा मनातला उच्चारदेखील कौतुकाने होत नव्हता तर संतापानेच होत होता. आणीबाणीच्या काळात इंदिरा

| June 12, 2013 01:29 am

विद्याचरण शुक्ला हे नाव लोकांच्या मनात पोहोचले ते आणीबाणीच्या कालखंडात. अर्थात त्या नावाचा मनातला उच्चारदेखील कौतुकाने होत नव्हता तर संतापानेच होत होता. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या चरणी विद्याचरणांची निष्ठा एकवटली आणि संजय गांधी यांच्या चरणीही त्यांची सेवा रूजू झाली होती.
बिनीचे कायदेतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक व काँग्रेसचे आघाडीचे नेते आणि मध्यप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांचा राजकीय वारसा पुत्र या नात्याने विद्याचरण यांना लाभला होता. १९५७ मध्ये ते लोकसभेची निवडणूक प्रथमच जिंकले आणि त्यानंतर नऊवेळा लोकांनी त्यांना खासदार म्हणून निवडले होते.
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत शुक्ला यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात दळणवळण, गृह, संरक्षण, अर्थ, नियोजन, नागरी पुरवठा, परराष्ट्र व्यवहार, संसदीय कामकाज व जलस्त्रोत अशी बहुतेक सर्वच खाती सांभाळली तरी त्यांचे नाव अधिक गाजले ते आणीबाणीच्या काळातले माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनच.
त्या काळात त्यांनी जे निर्णय घेतले त्यांच्याशी ते नंतरही ठाम राहिले. जनता पक्षाने नेमलेल्या चौकशी समितीसमोरही त्यांनी आपल्या निर्णयांचे जोरदार समर्थनच केले. मुंबईत काँग्रेसच्या एका मेळाव्यात गायला किशोर कुमार याने नकार दिल्यानंतर आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून किशोर कुमारच्या गाणी प्रसारित करण्यास शुक्लांनीच बंदी घातली होती. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीपही त्यांनीच लागू केली.
आणीबाणीनंतर निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा विरोधकांनी ‘इमर्जन्सी के तीन दलाल, संजय, शुक्ला, बन्सीलाल’ असे नारे दिले होते. नंतर संजय गांधी यांची पत्नी मनेका आणि पुत्र वरुण यांना भाजपने सामावून घेतले. शुक्लाही व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये होते तसेच भाजपतही अल्पावधीसाठी होते. बन्सीलाल यांनीही विरोधकांशी मोट बांधत आपली प्रादेशिक सत्ता टिकवून धरली होती. त्यामुळे ही नारेबाजी जनता पक्षापुरतीच टिकली.

नऊ वेळा जनतेने प्रतिनिधीत्वाची संधी दिली..
विद्याचरण १९५७ मध्ये लोकसभेची निवडणूक प्रथमच जिंकले आणि त्यानंतर नऊवेळा लोकांनी त्यांना खासदार म्हणून निवडले होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत शुक्ला यांनी गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र व्यवहार, संसदीय कामकाज अशी महत्त्वाची खाती सांभाळली. काही काळ शुक्ला भाजपातही होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 1:29 am

Web Title: vidya charan shukla partner of controversial emergency
टॅग : Congress
Next Stories
1 विद्याचरण शुक्ला यांचे निधन
2 ओदिशासाठी दिल्लीत ‘स्वाभिमान’ मेळावा
3 तुर्कस्तानात तकसीम चौकात उग्र निदर्शने
Just Now!
X