विजय मल्ल्या कर्नाटकचा सुपूत्र असून तो देशातून पळून गेलेला नाही, असे विधान माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी शनिवारी केले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना देवेगौडा यांनी मल्ल्यांचे समर्थन केले. यावेळी त्यांनी किंगफिशर एअलाईन्ससंदर्भात बोलताना सांगितले की, सध्याच्या काळात अनेक विमान कंपन्या तोट्यात व्यवसाय करत आहेत. त्यामुळे मल्ल्या यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या उद्योगपतीला लक्ष्य करण्यात काहीच अर्थ नसल्याचे देवेगौडा यांनी म्हटले.
मी फरारी नाही, कायदा पाळणार – मल्या

बँकांची तब्बल ९००० कोटींची कर्जे डोक्यावर असलेले मल्ल्या २ मार्चला परदेशात निघून गेले होते. मल्ल्या सध्या लंडनच्या उत्तरेला एका खेडय़ात राहत असल्याची माहिती आहे. विजय मल्या यांना येत्या आठवडय़ात होणाऱ्या सुनावणीसाठी हजर राहण्याबाबतचे समन्स सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी बजाविले. यासाठी मल्या यांना आता मुंबईत हजर राहावे लागेल.
सक्तवसुली संचालनालयाचे ‘पसार’ मल्यांना समन्स