News Flash

विजय मल्ल्याला फरार घोषित करता येऊ शकते: ब्रिटन कोर्ट

भारतीय बँकांना जवळपास ९ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात फरारी झालेला भारतीय उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटनमधील न्यायालयाने सोमवारी धक्का दिला होता.

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi, vijay mallya liqor barron vijay mallya london extradition
विजय मल्ल्या (संग्रहित छायाचित्र)

भारतीय बँकांना गंडा घालून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला ब्रिटनमधील न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. विजय मल्ल्याला फरार घोषित करता येऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

भारतीय बँकांना जवळपास ९ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात फरारी झालेला भारतीय उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटनमधील न्यायालयाने सोमवारी धक्का दिला होता. तब्बल दीड अब्ज डॉलरच्या कर्जवसुलीसाठी भारतीय बँकांनी हा खटला दाखल केला होता. आपल्या जगभरातील मालमत्ता जप्त करण्याचा आदेश रद्दबातल ठरवावा, ही मल्ल्याची मागणीही ब्रिटिश न्यायालयाने धुडकावल्याने त्याला मोठा धक्का बसला होता. लंडनमध्ये मंगळवारी न्या. अँड्र्यू हेन्शॉ यांनी आयडीबीआयसह अन्य बँकांना भारतीय न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यास पूर्ण मुभा दिली होती. न्यायालयाने निकाल देताना मल्ल्याला कायद्यापासून पळ काढणारा फरार म्हणून घोषित करता येईल, असेही  नमूद केले आहे. त्यामुळे विजय मल्ल्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मी अनिवासी भारतीय असून १९९२ पासून मी ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे, असा दावा मल्ल्याने केला. न्यायालयाने हा युक्तीवाद फेचाळून लावला. ‘मार्च २०१६ पूर्वी मल्ल्या व्यवसायानिमित्त नियमितपणे भारत – ब्रिटन असा प्रवास करत असल्याचे समोर आले. भारतात त्याचे आर्थिक हितंसंबंध आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2018 6:07 am

Web Title: vijay mallya can be regarded as fugitive from justice says uk high court
Next Stories
1 ..तर माध्यमसंस्थांना लाभांपासून वंचित करू!
2 काश्मिरात अतिरेक्यांशी शस्त्रसंधीबाबत मतैक्य
3 माशांचे तेल संधिवाताविरुद्ध उपयुक्त