News Flash

परराष्ट्र मंत्रालयाकडून विजय मल्ल्यांचा पासपोर्ट स्थगित

ईडीकडून ९ एप्रिल रोजी मल्ल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.

| April 15, 2016 05:01 pm

Kingfisher Airlines Chairman Vijay Mallya : मल्ल्या यांनी त्यापैकी ४००० कोटींचे कर्ज येत्या सप्टेंबरपर्यंत फेडण्याचे आश्वासन दिले होते.

अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) मागणीनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांचे पारपत्र स्थगित करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. ९०० कोटींच्या आयडीबीआय कर्ज गैरव्यवहारप्रकरणी मल्ल्याविरुद्ध कारवाई करताना ईडीने बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाकडे मल्ल्या यांचे पारपत्र रद्द करण्याची मागणी केली होती. यापूर्वी ईडीकडून ९ एप्रिल रोजी मल्ल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, मल्ल्या यांनी चौकशीला उपस्थित न राहता मे महिन्यापर्यंतच्या मुदतीची मागणी केली होती. समन्स बजावल्यानंतर चौकशीला उपस्थित न राहण्याची मल्ल्या याची ही तिसरी वेळ होती. त्यामुळे मल्ल्या चौकशीदरम्यान असहकार्य करत असल्याचे सांगत ‘ईडी‘च्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयायाला पासपोर्ट कायदा १९६७ नुसार कारवाई करण्याची विनंती करुन प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे मल्ल्यांचे राजनैतिक पारपत्र (डिप्लोमॅटिक पासपोर्ट) रद्द करण्याची मागणी केली आहे. मल्ल्या यांनी २१ एप्रिलपर्यंत देशातील व परदेशातील सर्व संपत्ती जाहीर करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने याआधीच दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 4:35 pm

Web Title: vijay mallya passport suspended
Next Stories
1 भारताच्या हेकेखोर वृत्तीमुळेच द्विपक्षीय चर्चेला खीळ, पाकिस्तानचा कांगावा
2 मोदी आणि राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे कोल्लममध्ये मदतकार्यात अडथळा, पोलीस यंत्रणा हतबल
3 राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या रामनवमीनिमित्त शुभेच्छा
Just Now!
X