बँकांचे ९ हजार कोटीं बुडवून परदेशात पळालेला मद्य व्यपारी विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. बुधवारी मल्याच्या दोन हेलिकॉप्टरचा लिलाव करण्यात आला आहे. नवी दिल्लीच्या एका कंपनीनं मल्याची दोन्ही हेलिकॉप्टर ८.७५ कोटी रूपयांना खरेदी केली आहेत. यातील एक हेलिकॉप्टर हे मुंबईतील जुहू विमानतळावर उभे आहे.

विजय मल्याच्या दोन्ही हेलिकॉप्टरचा लिलाव ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कमीत कमी १.७५ कोटींची बोली लावण्याची अट ठेवण्यात आली होती. हे दोन्ही हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी आम्ही ८.७५ कोटी रुपये मोजल्याची माहिती कंपनीचे संचालक सत्येंद्र सहरावत यांनी दिली.

विविध १७ बँकांचे ९,००० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी मल्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.