23 January 2021

News Flash

विजय मल्लयाला ४ डिसेंबरपर्यंत जामीन, पत्रकारांसोबत मल्ल्याची हुज्जत

भारतातल्या १७ बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनला पळाला आहे

विजय मल्ल्या (संग्रहित छायाचित्र)

विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने ४ डिसेंबर पर्यंत जामीन मंजूर केला आहे. तसेच याप्रकरणाची पुढची सुनावणी ६ जुलैला होणार आहे. त्यामुळे लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्याला काही अंशी  दिलासाच मिळाला आहे. कोर्टाबाहेर आल्यावर विजय मल्ल्याला प्रश्न विचारण्यासाठी पत्रकारांनी गर्दी केली होती. त्यावेळी एका पत्रकाराने विजय मल्ल्याला चोर-चोर च्या घोषणाबाजीबाबत प्रश्न विचारला. ज्यानंतर विजय मल्ल्या पत्रकारावर चांगलाच चिडला. तुम्हाला काहीही माहिती नसेल तर प्रश्न विचारत जाऊ नका गप्प बसा असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. तसेच कोर्टात हजेरी लावतानाच, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, कोणाचीच फसवणूक केली नाही, असे म्हणत कर्जबुडव्या विजय मल्ल्याने आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले होते. आता विजय मल्ल्याला ४ डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आज झालेल्या सुनावणी साठी विजय मल्ल्या आपल्या मुलासाह हजर झाला होता. त्यावेळी त्याने आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत. तसेच मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावे आहेत असेही विजय मल्ल्याने कोर्टाबाहेर जमलेल्या पत्रकारांना सांगितले होते. कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात आज लंडन कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीआधी तो कोर्टात दाखल झाला त्यावेळी त्याने हे वक्तव्य केले आहे.

भारतातल्या बँकांचे ९ हजार कोटी बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनला पळाला आहे. भारताने केलेल्या तक्रारीनंतर एप्रिल महिन्यात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला तासाभरात जामीन दिला होता आणि सोडण्यात आले होते. सध्या विजय मल्ल्या जामिनावर मुक्त आहे. आता कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात लंडन कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. खरेतर १३ मे रोजी ही सुनावणी होणार होती मात्र ती महिन्याभरासाठी पुढे ढकलण्यात आली. आता याप्रकरणातली पुढची सुनावणी ६ जुलै रोजी होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2017 1:48 pm

Web Title: vijay mallyas hearing in london court today
Next Stories
1 ‘कोणाच्याही खानपानाच्या सवयींवर सरकारचा अंकुश नाही’
2 पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार
3 Goa Panchayat Election Results: परा पंचायतीमध्ये मायकेल लोबोंच्या पॅनलचा दणदणीत विजय
Just Now!
X