आर्थिक घोटाळ्यातील भारताचा फरार आरोपी मद्यसम्राट विजय मल्या याला प्रत्यार्पण खटल्याविरोधात अपील करण्यास लंडनच्या हायकोर्टाने परवानगी दिली आहे. हा मल्लासाठी दिलासादायक निर्णय आहे मात्र, त्यामुळे त्याला भारतात आणणे आणखी लांबणीवर पडणार आहे.
Vijay Mallya’s permission to appeal against the extradition case has been approved by the Royal Courts of Justice,London. Details awaited. pic.twitter.com/5wzU0KzVpK
— ANI (@ANI) July 2, 2019
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयला ९००० हजार कोटींचा चुना लाऊन देशातून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याबाबत लंडनच्या कोर्टात खटला दाखल आहे. दरम्यान, मल्याने ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांच्यामार्फत त्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर सह्या करण्याविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी मागितली होती. भारतीय स्टेट बँकेची ९,००० कोटी रुपयांची फसवणूक आणि आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मल्याला भारताच्या स्वाधीन करण्यात यावे, अशी मागणी भारताने लंडन सरकारकडे केली आहे. आपल्या पहिल्याच अर्जाद्वारे अपील करण्याची सूट मिळण्याबाबतचा खटला मल्ल्या ब्रिटनच्या उच्च न्यायालयात हारला आहे. त्यानंतर आज त्याच्या नव्या अर्जावर तोंडी सुनावणी झाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 8:35 pm