गुजरातमध्ये भाजपाने मोठा फेरबदल करत विजय रुपाणी यांना  राजीनामा द्यायला सांगितला. त्यानंतर भूपेंद्र पटेल यांना गुजरातचे नवीन मुख्यमंत्री केले. अनेकांनी रुपाणी यांच्या राजीनाम्यामागील कारण त्यांची कमी होत असलेली लोकप्रियता असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचे म्हटले आहे. मात्र, विजय रूपाणी यांची मुलीने अशा लोकांना उत्तर दिले आहे. राधिका रुपाणी यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे टीकाकारांना उत्तर दिले आहे.

रुपाणी यांच्या मुलीने म्हटले आहे की, जेव्हा २००२ मध्ये अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता, तेव्हा माझे वडील मोदीजींच्या आधी तिथे पोहोचले होते. विजय रूपाणीच्या मुलीने ‘मुलीच्या दृष्टीकोनातून विजय रूपाणी’ असे लिहित ही फेसबुक पोस्ट केली आहे. तौक्ते चक्रीवादळासारख्या मोठ्या समस्यांमध्ये माझे वडील सकाळी २.३० पर्यंत उठायचे आणि लोकांसाठी व्यवस्था करण्यासाठी फोनवर गुंतलेले असायचे असे राधिकाने रुपाणी यांनी लिहिले आहे.

“बऱ्याच लोकांसाठी माझ्या वडिलांचा कार्यकाळ एक कार्यकर्ता म्हणून सुरू झाला आणि अनेक राजकीय पदांद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला, पण माझ्या मते, माझ्या वडिलांचा कार्यकाळ १९७९ मध्ये आलेला मोरबी पूर, अमरेलीतील ढगफुटी, कच्छ भूकंप, स्वामीनारायण मंदिर दहशतवादी हल्ला, गोध्रा घटना, बनासकांठा पूर या घटनांपासून सुरु झाला आहे. माझे वडील तौक्ते वादळात आणि कोविडच्या काळातही मोठ्या प्रमाणात काम करत होते,” असे राधिका यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये राजकीय हालचालींना वेग; राज्यपालांसोबत बैठकीनंतर विजय रुपाणींनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!

राधिका यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींचाही उल्लेख करत फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. पप्पांनी त्यांचे वैयक्तिक काम कधीच पाहिले नाही. त्याला जी काही जबाबदारी मिळाली ती त्यांनी आधी पूर्ण केली. कच्छ भूकंपाच्या वेळी ते सर्वात आधी तिथे गेले होते. लहानपणीही आई -वडिलांनी आम्हाला फिरायला नेले नाही. ते आम्हाला चित्रपटगृहात नाही तर काही कार्यकर्त्यांच्या घरी घेऊन जात असत.  स्वामी नारायण अक्षरधाम मंदिरात दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तेथे पोहोचणारे माझे वडील पहिले व्यक्ती होते, ते नरेंद्र मोदींच्या आधीच मंदिर परिसरात पोहोचले होते.

इंजीनियर, नगरसेवक, आमदार ते मुख्यमंत्री; सर्वांना मागे टाकत मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत कसे पुढे आले भूपेंद्र पटेल?

रुपाणी यांच्या सौम्य भूमिकेमुळे त्यांनी पद सोडावे लागले म्हणणाऱ्यांना राधिका यांनी उत्तर दिलं आहे. “राजकारण्यांमध्ये संवेदनशीलता नसावी? नेत्यामध्ये ही आवश्यक गुणवत्ता नाही का? लँड ग्रॅबिंग अॅक्ट, लव्ह जिहाद, गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम अँड ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट (गुजरातसीटीओसी) हे त्यांनी घेतलेल निर्यण याचे पुरावे आहेत. चेहऱ्यावर गंभीर भाव आणून दाखवणे हे नेते असल्याचे लक्षण आहे का?, ” असे राधिकाने म्हटले आहे.

माझे वडील नेहमी म्हणायचे की भारतीय चित्रपटांमध्ये असलेले राजकारण आणि राजकारण्यांची प्रतिमा आपल्याला बदलावी लागेल. त्यांनी कधीच गटबाजीला समर्थन दिले नाही आणि हीच त्यांची खासियत होती. काही राजकीय विश्लेषक कदाचित असा विचार करत असतील – ‘विजयभाईंच्या कार्यकाळाचा हा शेवट आहे’ – पण आमच्या मते दंगली किंवा टीका करण्याऐवजी आरएसएस आणि भाजपाच्या तत्त्वानुसार सत्ता सोडणे चांगले आहे, असे राधिका यांनी म्हटले आहे.