News Flash

बिहार : ते दोघं एकाच खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्यानंतर गावकऱ्यांनीच लावून दिलं लग्न

मंदिर परिसरात गावातील अनेक नागरिक गोळा झाले

संग्रहित छायाचित्र

बिहारमध्ये नालंदामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका प्रेमी जोडप्याला एकाच खोलीमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडल्यानंतर त्याचं लग्न लावून देण्यात आलं. ही घटना नालंदामधील सोहसराय पोलीस स्थानकाच्या हद्दीत शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. गावातील स्थानिकांनी या जोडप्याला एका खोलीमध्ये पकडल्यानंतर दोघांनाही गावातील मंदिरात नेण्यात आलं. तिथे सर्वांच्या उपस्थिती या दोघांचे लग्न लावून देण्यात आलं.

नक्की वाचा >> …म्हणून त्याने एकाच मंडपात दोन्ही गर्लफ्रेण्ड्ससोबत एकाच वेळी केलं लग्न; ५०० वऱ्हाड्यांनी लावली हजेरी

ज्या गावकऱ्यांनी या जोडप्याला खोलीमध्ये पकडलं त्यांनी या दोघांनाही मंदिरात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि हा लग्न सोहळा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मंदिर परिसरामध्ये गर्दी केली. ज्या जोडप्यासोबत हे घडलं ते मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. त्या दोघांमधील प्रेम संबंधांची कल्पना त्यांच्या कुटुंबियांना होती. शनिवारी संध्याकाळी हा तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला. सर्वांची नजर चुकवून हा तरुण मुलीच्या घरात शिरला. थोड्या वेळाने घरातील काही व्यक्तींना संक्षय आल्याने त्यांनी रुमचा दरवाजा उघडला असता दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. त्यानंतर घरच्यांनी आरडाओरड केला असता शेजारी राहणाऱ्या घरांमधील गावकरी धावात आले. पाहता पाहता मुलीच्या घरासमोर गर्दी गोळा झाली. शेकडो लोकांच्या गर्दीमधून या दोघांना गावातील मंदिरात नेण्यात आलं. या मुलाला मुलीच्या भांगेत सिंदूर भरण्यास सांगत गावकऱ्यांनी या दोघांचं लग्न लावून दिल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

विशेष म्हणजे मुलीच्या घरच्यांनाही या लग्नाला मान्यता देत मुलीला या मुलासोबत सासरी पाठवून दिलं. दुसरीकडे काही तरुणांनी या सर्व गोंधळात पार पडलेल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शूट करुन ते व्हायरल केलेत. हे व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याने या लग्नाबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अशाप्रकारे बिहारमध्ये लग्न लावून देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारची लग्न लावून देण्याची प्रकरण समोर आली आहेत. अशाप्रकारच्या लग्नांना येथे पकड़ौआ विवाह (म्हणजेच प्रेयसी आणि प्रियकराला पकडून विवाह लावून देणं) असं म्हणतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 10:37 am

Web Title: villagers forcefully marries girl with her boyfriend in nalanda bihar scsg 91
Next Stories
1 धक्कादायक! मुलगी झोपलेली असताना शेजारी भिंत ओलांडून घरात घुसला आणि…
2 नियमांचे उल्लंघन करुन बढती मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांना योगी सरकारचा दणका; थेट चौकीदार, कारकून पदावर केली नियुक्ती
3 Coronavirus – देशात मागील २४ तासांत १९ हजार २९९ जण करोनामुक्त
Just Now!
X