News Flash

बांबूच्या बेटावर लावलेल्या टीव्हीवर अमित शाह यांचं भाषण ग्रामस्थ ऐकतानाचा फोटो व्हायरल, ट्विपल्स संतापले

ग्रामीण भागात बांबूच्या बेटावर एलईडी लावून दाखवलं अमित शाह यांचं भाषण, फोटो ठरतोय चर्चेचा विषय

पश्चिम बंगालमधील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत ग्रामस्थ बांबूच्या बेटावर लावलेल्या टीव्हीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण ऐकत असताना दिसत आहे. एकीकडे पश्चिम बंगाल अम्फान वादळातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना आणि दुसरीकडे देशभरात करोनाने थैमान घातलं असतानाच हा फोटो समोर आल्याने ट्विटरवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने अमित शाह यांच्या व्हर्च्युअल रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये ७० हजार फ्लॅट स्क्रीन टीव्ही तर १५ हजार मोठ्या एलईडी स्क्रीन लावल्या होत्या. या रॅलीच्या माध्यमातून भाजपाने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यात जवळपास ७८ हजार मतदान केंद्र आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी हा फोटो ट्विट केला आहे. “ग्रामीण भागातील लोक अमित शाह यांचं भाषण ऐकत आहेत. गेल्या पाच वर्षात मेहनत करुन भाजपा इथपर्यंत पोहोचली आहे. लोकांना अच्छे दिन हवे आहेत,” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे या फोटोवरुन काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने जोरदार टीका केली असून खडे बोल सुनावले आहेत. उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते राकेश सचन यांनी म्हटलं आहे की, “भाजपा करोनाचा फटका बसलेल्या मजुरांना ७५०० रुपये किंवा वाहतुकीची व्यवस्था करुन देऊ शकत नाही, पण निवडणुकीचा प्रचार जोरात करत आहे”.

आम आदमी पक्षाने तर हा फोटो शेअर करत लोकांनाच याला काय कॅप्शन द्याल असं विचारलं आहे. व्हेंटिलेटर ऐवजी एलईडीची व्यवस्था भाजपाने केली आहे असा टोलाही आपने लगावला आहे.

भाजपाने मंगळवारी बोलताना अमित शाह यांच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. पश्चिम बंगालमधील दोन कोटी लोकांनी अमित शाह यांचं भाषण ऐकल्याचं भाजपाने सांगितलं आहेत. टीएमसीने मात्र हा खोटा दावा असल्याचं सांगत सत्यतेपासून हे फार दूर असल्याचं म्हटलं आहे.

अमित शाह यांनी भाजपाच्या जनसंवाद मोहिमेचा भाग म्हणून दिल्ली येथून लोकांना संबोधित केलं. या मोहिमेचा निवडणुकीशी काही संबंध नसल्याचं भाजपाने सांगितलं आहे. पण भाजपाने बिहार आणि बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये जिथे निवडणूक होणार आहे तिथे रॅली घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 11:31 am

Web Title: villagers listening to amit shah on led screen affixed to a bamboo shrub is viral sgy 87
Next Stories
1 सीमेवर पाकिस्तानकडून तोफगोळयांचा मारा, जवान शहीद
2 मजुरांसाठी बिग बींची मदत, उत्तर प्रदेशच्या 700 जणांना विमानाने पाठवलं घरी
3 भारतात करोनाबाधितांची संख्या ३ लाखांच्या जवळ, कम्युनिटी ट्रान्समिशन नाकारणं चुकीचं; तज्ज्ञांचं मत
Just Now!
X