शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार विनायक राऊत यांची लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी निवड झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे.

खासदार विनायक राऊत यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा 1 लाख 78 हजार 322 मतांनी पराभव केला होता. तर 2014 मध्येही त्यांनी दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. तसेच 1985 ते 1992 या कालावधीत त्यांनी मुबंई महानगरपालिकेत नगरसेवक पदही भूषवले होते. तर 1999 मध्ये विधानसभा सदस्य तर 2012 मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून गेले होते.

CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi
“विखे पाटलांची मुळं इतकी खोलवर आहेत, की मविआचं वरून कुणी आलं तरी…”, एकनाथ शिंदेंचा नगरमधून हल्लाबोल!
Kapil Patil met Raj Thackeray,
भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील यांच्याकडून मनसेचे राज ठाकरे यांची भेट
Ajit Pawar, Shrirang Barne,
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार आले, पार्थ पवार येणार?
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपाला मोठे यश मिळाले असून शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.