News Flash

‘फोगट’ कन्येने जिंकले सुवर्ण; नंबर वन स्थान पुन्हा कायम

टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू

छायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने मट्टे पेलेकोन रँकिंग मालिका स्पर्धेत सलग आठवड्यांमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या गटात अव्वल स्थान मिळवले.

जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी २६ वर्षीय विनेश टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. विनेशने ५३ किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरला ४-० ने हरवले.

गेल्या आठवड्यात विनेशने किवमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. स्पर्धेत प्रवेश करताना तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या विनेशने १४ गुणांची कमाई करत जागतिक क्रमवारीत आपले प्रथम स्थान परत मिळवले. विनेशने या स्पर्धेत एकही गुण गमावला नाही. शनिवारी सरिता मोरने ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 1:29 pm

Web Title: vinesh phogat wins gold and reclaims number one position sbi 84
Next Stories
1 कारकीर्दीची अर्धशतकपूर्ती!
2 भारताचे लॉर्ड्स पक्के!
3 दोन ध्रुव!
Just Now!
X