15 August 2020

News Flash

माझ्या हकालपट्टीआधी केजरीवालांनी जनमत घ्यायला हवे होते – बिन्नी

आम आदमी पक्षातून माझी हकालपट्टी करण्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनमत घ्यायला हवे होते, अशी मागणी पक्षाचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी सोमवारी केली.

| January 27, 2014 11:51 am

आम आदमी पक्षातून माझी हकालपट्टी करण्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनमत घ्यायला हवे होते, अशी मागणी पक्षाचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी सोमवारी केली. हकालपट्टीच्या निषेधार्थ बिन्नी सोमवारी सकाळपासून जंतरमंतरवर धरणे आंदोलनास बसले आहेत.
दिल्लीमध्ये सरकार स्थापण्यापूर्वी केजरीवाल यांनी संपूर्ण दिल्लीमध्ये जनमत घेतले होते. त्याचप्रमाणे मला पक्षातून काढण्याआधी त्यांनी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जनमत घ्यायला हवे होते. दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यापासून केजरीवाल सर्व निर्णय हुकूमशाही पद्धतीने घेऊ लागले आहेत, असाही आरोप बिन्नी यांनी केला.
बिन्नी यांची पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून ‘आप’मधून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी सोमवारपासून जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरू केले.
बिन्नी पत्रकारांना म्हणाले की, पक्षातून निलंबीत करण्यात आल्याची कोणतीही नोटीस अद्याप मला आलेली नाही आणि दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यापासून आप दूर जाऊ शकत नाही किंवा मी तरी त्यांना आश्वासनांपासून दूर जाऊ देणार नाही.” असे म्हणत बिन्नींनी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
 ‘आप’ विरूध्द ‘आप’; पक्षाने दिल्लीकरांना धोका दिल्याचा बिन्नींचा आरोप
बिन्नी यांनी १६ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांना हुकुमशहा म्हणत आप सरकार त्याच्या उद्देशांपासून दूर जात असल्याचा आरोप केला होता. निवडणुकीच्या प्रचारात आपने दिलेली आश्वासने आणि आता करीत असलेली कृती यामध्ये खूप तफावत आहे, असे बिन्नी यांनी म्हटले होते. यावर बिन्नी यांच्यावर पक्ष नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून निलंबन करण्यात आल्याचे ‘आप’कडून जाहीर करण्यात आले आहे. 
‘आप’चे बंडखोर आमदार बिन्नी- हजारे भेट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2014 11:51 am

Web Title: vinod kumar binny to fight expulsion threatens protest against aap
Next Stories
1 हरियाणातील शेतजमीन राहुल गांधींकडून प्रियंकाला भेट
2 ‘काळा पैसा परत आणण्याचे वचन देणाऱया पक्षालाच मत द्या’
3 टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचा संशयास्पद मृत्यू
Just Now!
X