20 October 2020

News Flash

पाकिस्तानकडून पुन्हा आगळीक; गोळीबारात एक जवान शहीद

नौशारा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले

संग्रहित छायाचित्र

पाकिस्तानकडून सीमा रेषेवर कुरापती करणे सुरूच आहे. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन व घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याकडून आज देखील एलओसीवरील जम्मू-काश्मीरमधील नौशारा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. यास भारतीय जवानांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार राजविंदर सिंग हे शहीद झाले.

पाकिस्तानी सैन्याशी लढत असताना नायब सुभेदार राजविंदर सिंग यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर उपचारा दरम्यान ते शहीद झाले. भारतीय लष्कराचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी याबाबत माहिती दिली. नायब सुभेदार राजविंदर सिंग हे अतिशय शूर व देशाच्या रक्षणासाठी समर्पित असे सैनिक असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर, त्या ठिकाणी देखील एक जवान शहीद झाला आहे. काल रात्रीपासून या परिसरात चकमकीस सुरूवात झाली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 3:01 pm

Web Title: violation of arms embargo by pakistan deputy subhedar martyred msr 87
Next Stories
1 ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
2 …पण मोदींनी खेळण्यांवर केली ‘मन की बात’; राहुल गांधींचं टीकास्त्र
3 लोकल खेळण्यांसाठी आता व्होकल होण्याची वेळ आहे : मोदी
Just Now!
X