जनतेच्या खासगी जीवनाशी निगडित असलेल्या कोणत्याही भारतीय कायद्याचे अमेरिकेतील संस्थांनी उल्लंघन केल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा सरकारने दिला असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
भारतीयांकडून माहिती महाजालाचा वापर करण्यात येतो, त्यावर अमेरिकेकडून पाळत ठेवण्यात येत असल्याच्या कथित वृत्ताबद्दल सरकारने चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे भारतीय कायद्याचा भंग होत असल्यास ते अस्वीकारार्ह आहे, असे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
अमेरिकास्थित गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट व अन्य कंपन्यांच्या सहकार्याने अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्था जागतिक पातळीवर सर्व प्रकारच्या माहितीवर पाळत ठेवत असल्याचा आरोप एडवर्ड स्नोडेन याने केला होता.
यावर सरकारचा अभिप्राय रविशंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.