पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात ७५ टक्के मतदान झाले. मतदान दरम्यान मतदान केंद्र ताब्यात घेणे, मतदानापासून रोखणे आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामध्ये दोन जण ठार झाले तर एका तरुणाचा मृतदेह सापडला.तिसऱ्या टप्प्यात दक्षिण परगाणा, उत्तर परगाणा आणि हावडा जिल्ह्य़ात मतदान झाले. दक्षिण परगाणा जिल्ह्य़ात मोरापै येथे तृणमूल काँग्रेस समर्थक सनथ घोष यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तर मदरबक्स मौलिक हा आपला कार्यकर्ता उत्तर परगाणा जिल्ह्य़ात बॉम्बस्फोटात जखमी झाल्याचा दावा माकपने केला आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदान झाल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभेत केला.