News Flash

बीएमडब्ल्यु, फरारी आणि लॅम्बोर्गिनी ट्रॅफिकमध्ये फसतात तेव्हा…

समजा, तुमच्याकडे २.२० कोटींची कार असेल आणि तुम्ही रस्त्यावरून जात आहात. परंतु, ट्रॅफिकमुळे तुम्हाला साध्या सार्वजनिक परिवहन खात्याच्या बसच्यापुढेही जाता येत नसेल, तेव्हा तुम्हाला कसे

| March 21, 2015 05:33 am

समजा, तुमच्याकडे २.२० कोटींची कार असेल आणि तुम्ही रस्त्यावरून जात आहात. परंतु, ट्रॅफिकमुळे तुम्हाला साध्या सार्वजनिक परिवहन खात्याच्या बसच्यापुढेही जाता येत नसेल, तेव्हा तुम्हाला कसे वाटेल ? नक्कीच तुम्हाला अशा प्रसंगाला सामोरे जायला आवडणार नाही. मात्र, बंगळुरूमध्ये चक्क तीन सुपरकार्सच्या चालकांना या परिस्थितीचा सामना करावा लागला. रस्त्यावरील ट्रॅफिकमधून वाट काढता न आल्याने बीएमडब्य्लु ८, लॅम्बोर्गिनी अॅव्हेटडर आणि फेरारी ४५८ इटालिया या तीन सुपरकार्स कर्नाटक परिवहन खात्याच्या बसच्यामागे अडकून पडल्याचे अभुतपूर्व दृश्य लोकांना पहायला मिळाले. एकतर अशा गाड्या दररोज रस्त्यावर पाहायला मिळत नाहीत आणि अशा परिस्थितीत तर नाहीच नाही. त्यामुळे अशा प्रसंगाचे छायाचित्र कुणाला टिपावेसे वाटले नाही तर नवलच. त्यावेळी प्रवास करणाऱ्या अनिल कापसे यांनी हाच मौका साधत रस्त्यावरील हे ‘विदारक’ दृश्य टिपले. त्यांनी हे छायाचित्र सोशल साईटसवर टाकल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच व्हायरल झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2015 5:33 am

Web Title: viral bmw ferrari and lamborghini stuck in bangalore traffic behind a bmtc bus
Next Stories
1 उत्तरप्रदेशमध्ये रेल्वे अपघातात ३४ ठार
2 काळा पैसा रोखणारे विधेयक लोकसभेत सादर
3 राजेंद्रसिंह राणा यांना ‘पाण्याचे नोबेल’ जाहीर
Just Now!
X