08 March 2021

News Flash

Viral Video : ‘आयसीयू’मध्ये दाखल झालेल्या महिलेवर बलात्कार, आरोपी ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद

रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा अतिप्रसंग ओढाविल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.

झज्जर जिल्ह्यातील बहादुरगढमधील एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाली असून, समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकास आपण डॉक्टर असल्याचे भासवून पहाटे साडे तीनच्या सुमारास आरोपी अतिदक्षता विभागात (आयसीयू) घुसल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजते. पीडित महिला ही दिल्ली पोलीसदलात कार्यरत असलेल्या पोलीस उप-निरीक्षकाची पत्नी आहे. सदर महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ही घटना घडली त्यावेळी ‘आयसीयू’ कक्षात रुग्णालयाचा कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हता. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा अतिप्रसंग ओढाविल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत असून, ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झालेल्या आरोपीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2016 11:48 am

Web Title: viral video new mother allegedly raped in icu in private hospital in haryana man caught on cctv
टॅग : Cctv,Hospital
Next Stories
1 जेएनयूमधील आंदोलनाला हाफीजचा पाठिंबा!
2 दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला एफ १६ विमाने
3 अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा अकाली मृत्यू
Just Now!
X