देशभरात जनतेने आज आपापल्या पद्धतीने ७३वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. देशप्रेमाचा जज्बा दाखवण्यासाठी काहीतरी अनोखे सादर करण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर धडपडताना दिसले. पंजाबमधील एका गावात दोन ट्रॅक्टरच्याबाबतही असेच काहीसे भन्नाट घडले. या ट्रॅक्टरच्या चालकांनी एका वेगळ्याच अंदाजात आज तिरंग्याला सलामी दिली.