जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गिलानी ‘हम पाकिस्तानी हैं और पाकिस्तान हमारा है’ अशा घोषणा देताना दिसत आहे. गिलानी यांच्याच नावाने चालवण्यात येणाऱ्या एका अकाऊण्टवरुन हा व्हिडिओ मे महिन्यात शेअर करण्यात आला होता. मात्र व्हिडिओ ट्विट करण्यात आलेले अकाऊण्ट व्हेरिफाइड नाही. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी फुटीरतावादी नेते केंद्र सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये गिलानी एका सभेमध्ये प्रक्षोभक भाषण देताना दिसत आहेत. याच भाषणादरम्यान त्यांनी ‘इस्लामवरील प्रेमामुळे आणि इस्लामशी असलेल्या संबंधांमुळे आपण पाकिस्तानी आहोत, पाकिस्तान आपला आहे’ अशी घोषणाबाजी केली. गिलानी यांनी घोषणा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनाही घोषणा दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ही सभा काश्मीरमधील कोणत्या भागात आणि कधी आयोजित करण्यात आली होती याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जर गिलानी स्वत:ला पाकिस्तानी म्हणवून घेत असतील तर त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नसून त्यांना लवकरात लवकर पाकिस्तानात पाठवायला हवं अशा आशयाच्या अनेक कमेंट्स ट्विटवर पहायला मिळत आहेत.

चला यांना सिमेपलीकडे पाठवा

नटौंकी नको आता

यांना पाकिस्तानमध्ये पाठवा

हे देशभक्त आहेत का?

यांना तिकडेच पाठवा

द्वेष पसरवण्याचं काम

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हुर्रियत नेते केंद्र सरकारबरोबर चर्चेसाठी तयार आहेत असं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. मलिक यांच्या या वक्तव्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झालेला पहायला मिळत आहे. ‘हुर्रियत कॉनफर्न्स आधी चर्चेसाठी तयार नव्हते. रामविलास पासवान २०१६ साली चर्चेसाठी त्यांच्या दारातही गेले होते, मात्र ते चर्चेला तयार नव्हते. आता परिस्थिती बदलली असून त्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे’, असं मलिक यांनी सांगितले होते.