06 August 2020

News Flash

मद्यपी तरुणाची वृद्ध दाम्पत्याला मारहाण, कॅमेऱ्यात झाला कैद!

मद्यपान केलेल्या तरुणाने एका वयोवृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच दुकानात शिरून मारहाण केली.

मद्याच्या प्रभावाखाली असलेल्या आरोपीने संतोष कुमारी यांच्याशी गैरवर्तन केले.

मद्यपान केलेल्या तरुणाने एका वयोवृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच दुकानात शिरून मारहाण केल्याची घटना चंदिगढमध्ये घडली असून, दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ह्या घटनेची नोंद झाली आहे. आरोपी राजीवने बुधवारी रात्री जोगिंदरपाल सोनी आणि त्यांची पत्नी संतोष कुमारी यांच्या मोबाईल शॉपध्ये घुसून त्यांना मारहाण केल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मद्याच्या प्रभावाखाली असलेल्या आरोपीने संतोष कुमारी यांच्याशी गैरवर्तन केले. संतोष कुमारीकडून त्याचा प्रतिकार करण्यात आला असता आरोपी राजीवने त्यांच्या थोबाडीत मारली. राजीवने केलेल्या मारहाणीत त्यांचे दातदेखील तुटले. पती जोगिंदरपाल सोनी यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता राजीवने त्यांनादेखील मारहाण केली. वृद्ध दाम्पत्याने सदर घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवल्यानंतर पेशाने ड्रायव्हर असलेल्या राजीवला पोलिसांनी अटक केली. जवळच्याच परिसरात राहात असलेल्या राजीवशी आपले वैयक्तिक वैर नसल्याचे वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना सांगितले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर वृध्द दाम्पत्याची वैद्यकीय तपासणी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 7:37 pm

Web Title: viral videos trendingvideo captures elderly couple being thrashed by drunk youth in chandigarh
Next Stories
1 त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू द्या – सोनिया गांधींचे मोदींना प्रत्युत्तर
2 सलमानप्रमाणे मीसुद्धा निर्दोष सुटेन – आसाराम बापू
3 आरएसएस म्हणजे आयएसआय आहे का? – नितीन गडकरींचा सवाल
Just Now!
X