अरुण जेटली डीडीसीएचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात डीडीसीएमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मात्र, विरोधक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य करत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने अरुण जेटलींची पाठराखण केली आहे.
मी दिल्ली क्रिकेट संघामधून खेळत असताना मला एखाद्या खेळाडूची निवड आश्चर्यकारक वाटली तर, मी लगेच अरुण जेटलींना सांगायचो आणि ते योग्य खेळाडूला न्याय मिळवून द्यायचे तसेच अरुण जेटली खेळाडूंसाठी नेहमी उपलब्ध असायचे , असे विरेंद्र सेहवागने म्हटलेय. तर डीडीसीएमधील भ्रष्टाचाराबद्दल जेटलींवर आरोप करणे चुकीचे आहे. त्यांनी प्राप्तीकर भरणाऱ्या नागरिकांचा पैसा न वापरता दिल्लीत स्टेडियम उभारले. माजी खेळाडूंकडून त्यांच्यावर आरोप करणे, दुर्भाग्यपूर्ण आहे, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.
अरुण जेटली २०१३ पर्यंत  वर्षे डीडीसीएचे अध्यक्ष होते.