News Flash

विशाखापट्टनम : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या रिफायनरीमध्ये स्फोट; अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण

कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनम येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेडच्या रिफायनरीला मंगळवारी आग लागण्याची घटना घडली. या घटनेनंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

एपीसीएलच्या जुन्या टर्मिनलच्या क्रूड डिस्टिलेशन युनिटमध्ये ही भीषण आग लागली. घटनेनंतर लगेचच कर्मचारी व कामगार युनिटच्या बाहेर आले. मोठा स्फोट होऊन ही आग लागली अशी माहिती येथील कामगारांनी दिली. त्यानंतर तिथे असलेल्या अग्निशमन यंत्रणेद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ लागले. मात्र आग मोठ्या स्वरुपात असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले त्यानंतर ही आग आटोक्यात आली अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एचपीसीएलच्या विसाख रिफायनरीच्या एका क्रूड प्रोसेसिंग युनिटमध्ये आग लागण्याची घटना घडली. अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने ही आग तातडीने विझवण्यात आली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही तसेच इतर रिफायनरी सुद्धा सुरक्षित असल्याचे एचपीसीएलतर्फे सांगण्यात आले.


गेल्या वर्षीसुद्धा मे महिन्यात लागली होती आग लागली

यापूर्वी गेल्या वर्षी २१ मे रोजी एचपीसीएलच्या रिफायनरीमध्ये भीषण आग लागली होती. तांत्रिक कारणांमुळे आगीची घटना घडली होती. त्यानंतर बर्‍याच प्रयत्नांनंतर, क्रूड डिस्टिलेशन युनिट प्लांट पुन्हा सुरू करण्यात आला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 5:53 pm

Web Title: visakhapatnam explosion at hindustan petroleum refinery fire control from the fire department abn 97
Next Stories
1 कुस्तीपटू सागर राणाच्या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती, सुशील कुमारच्या अडचणीत वाढ
2 बंगाल हिंसाचाराप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे खडे बोल; नागरिकांच्या पलायनाबाबत मागितलं स्पष्टीकरण
3 सागर राणा हत्याकांड : सुशील कुमारचं नोकरीवरून निलंबन
Just Now!
X