वास्तव जीवनात ड्रॅक्युला असलेला क्रूर रोमानियन नेता काउंट व्लाद टेपीस याचे थडगे इटलीतील नेपल्स येथे सापडल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. ‘ड्रॅक्युला’ या व्हॅम्पायर कादंबऱ्या व चित्रपटातील पात्राशी त्याची तुलना केली जाते. इटलीतील म्युझियम ऑफ एन्शंट पॉप्युलेशन (प्राचीन लोकसंख्या संग्रहालय) चे संचालक निकोला बारबाटेली व त्यांचे बंधू गियान्दोमेनिको व राफेलो ग्लिनी यांनी असा दावा केला की, कथित ड्रॅक्युला असलेल्या काउंट व्लाद टेपीस याचे थडगे आम्हाला इटलीतील नेपल्स शहरात मध्यवर्ती भागामध्ये सापडले आहे, असे ‘द लोकल’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. संशोधकांनी काही ऐतिहासिक कागदपत्रांच्या मदतीने व्लाद द इमपेलरचा संबंध पियाझा सांता मारिया ला नोवा यांच्याशी जोडला आहे, असे इटलीच्या ‘गॅझेटिनो’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.

कोण होता टेपीस?
टेपीस हा क्रूर होता व त्याच्या जीवनावरून प्रेरणा घेऊन ब्रॅम स्टोकरने १९८७ मध्ये एक कादंबरी लिहिली होती व ती गाजली होती. टेपीसने त्याच्या विरोधकांना धातूच्या काठीने भोसकून ठार केले होते. इतिहासकारांच्या मते टेपीस हा वालाशिया या तुर्क शासक बसराब लायोटा याच्या ताब्यातील प्रदेश पुन्हा जिंकून घेण्यासाठी रोमानियातील बुखारेस्ट-गिउरगियू रस्त्यावर अपघातात मारला गेला होता. काहींच्या मते टेपीस याला बुखारेस्ट जवळ स्नागोव्ह या राजेशाही बेटावर दफन करण्यात आले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार टेपीसचे दफन रोमानियातील कोमाना या राजेशाहीच्या दफनभूमीत करण्यात आले, त्याचे थडगे पाडण्यात आले व नंतर १५८९ मध्ये पुन्हा बांधण्यात आले. नवीन अभ्यासातील दाव्यानुसार टेपीस याला १४७६ मध्ये कैदी बनवण्यात आले. त्यात त्याच्या मुलीच्या बदल्यात त्याला ओलिस ठेवण्यात आले नंतर त्याचे नेपल्स येथे दफन करण्यात आले.