जो बायडन यांना अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष मानण्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन अद्यापही तयार नाहीत. त्यामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातील वैर पुन्हा एकदा समोर आलं आहे. बायडन यांच्याऐवजी मी सध्या दुसऱ्या कोणाही अमेरिकन नेत्यासोबत काम करण्यास तयार आहे असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.

जनतेला संबोधित करताना रविवारी पुतिन म्हणाले, “अमेरिकन लोकांचा आत्मविश्वास असलेल्या कोणाहीसोबत आम्ही काम करु. पण हा आत्मविश्वास असलेल्या व्यक्तिचा विजय विरोधीपक्षाला मान्य असेल तरच किंवा कायदेशीर मार्गानं निकाल निश्चित झाला असेल तरच. बायडन यांचं अभिनंदन न करण्याच्या निर्णयामागे एक औपचारिकता आहे कोणताही गुप्त हेतू नाही. रशिया आणि अमेरिकेतील संबंध उद्ध्वस्त झाल्याची मला पूर्ण कल्पना आहे.”

दरम्यान, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा २०१६ मध्ये विजय झाला होता. तेव्हा पुतिन यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. पण ट्रम्प यांच्या विरोधी उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी देखील निवडणुकीचा निकाल स्विकारला होता.

आणखी वाचा- अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांनी भारताबद्दल केलं पहिलं विधान, पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाले…

अमेरिकेच्या निवडणुकीत बायडन यांचं पारड जड झाल्यानंतर काही दिवसांनंतर पुतिन यांचे प्रवक्ते ड्मिटी पेस्कोव्ह यांनी पत्रकारांशी बोलताना ही निवडणूक वेगळी असल्याचं म्हटलं होतं. पुतिन यांनी सध्या थांबा आणि पाहा ही भूमिका स्विकारली आहे. याचा अर्थ असा नाही की आम्हाला कोण आवडत किंवा कोणी आवडत नाही. यामध्ये अमेरिकेचं अंतर्गत राजकारण संपण्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्याचबरोबर आपल्याला ट्रम्प आणि बायडन यांच्याप्रती सारखाच आदर आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या प्रमुख्य मांध्यमांनी जो बायडन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी उमदवार असं सादर केलं आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी दावा केला आहे की त्यांनी निवडणूक जिंकली आहे पण माझा विजय हा निवडणुकीतील घोटाळ्यामुळं चोरला आहे. यासाठी ट्रम्प यांनी सगळ्याची पडताळणी आणि काही राज्यांमध्ये मतदानाची पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे.