News Flash

फोक्सवॅगन देणार ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ

प्रदूषण लपवणाऱ्या सॉफ्टवेअरची लबाडी उघड झाल्याने फोक्सवॅगनला आर्थिक फटका बसला होता

फॉक्सवॅगन- एजी आणि त्यांची चीनची सहायक कंपनी एफएडब्ल्यू- फॉक्सवॅगन चीनमधून ४८ लाख कार परत मागवणार आहे.

फोक्सवॅगन या कार निर्मिती करणाऱ्या कंपनीने ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषण लपवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रकरणात कोट्यवधी डॉलर्सचा फटका सहन करावा लागल्यामुळे फोक्सवॅगन कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. डिझेल गाड्यांमध्ये प्रदूषण लपवण्यासाठी केलेली लबाडी लक्षात आल्याने आता इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या आणि डिजीटल सेवांमध्ये अधिकाधुक गुंतवणूक करण्याचा निर्णय फोक्सवॅगनने घेतला आहे.

‘लवकरच ३० हजार कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात येईल. यातील २३ हजार कर्मचारी जर्मनीमधील असतील,’ अशी माहिती कंपनीकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. यामुळे २०२० सालापासून कंपनीच्या ४० कोटी डॉलर्सची बचत होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

अमेरिकेन यंत्रणांना दंड आणि ग्राहकांना नुकसान भरपाई म्हणून फोक्सवॅगनला १५ कोटी डॉलर्स द्यावे लागणार आहेत. फोक्सवॅगनच्या डिझेल गाड्यांमध्ये प्रदूषण लपवणारी यंत्रे लावण्यात आली होती. या गाड्या वापरणाऱ्या लोकांना फोक्सवॅगनला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. फोक्सवॅगनच्या जगभरातील १ कोटी १० लाखांमध्ये प्रदूषण लपवणारी यंत्रे आढळून आली होती. यामुळे फोक्सवॅगनच्या व्यवस्थापनामध्ये मोठे फेरबदल झाले होते. या प्रकरणात झालेला तोटा भरुन काढून काढण्यासाठी फोक्सवॅगनने कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘यापुढे अनावश्यक खर्च आणि गुंतवणूक कमी करण्यात येईल. बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या निर्मितीत अधिकाधिक गुंतवणूक केली जाईल. कार-शेअरिंग, बाईक-शेअरिंग क्षेत्राशी संबंधित सेवांना प्राधान्य देण्यात येईल,’ असे फोक्सवॅगनकडून सांगण्यात आले आहे. ‘येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती जर्मनीमध्येच करण्यात येईल,’ अशी माहिती फोक्सवॅगनकडून देण्यात आली आहे.

फोक्सवॅगन समूहात ६ लाख कर्मचारी काम करतात. यामध्ये १ लाख २० हजार कर्मचारी जर्मनीतील आहे. याच कर्मचाऱ्यांना कामगार कपातीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. जर्मनीसोबतच ब्राझील आणि अर्जेंटिनामधील कर्मचाऱ्यांनाही फोक्सवॅगनकडून सेवेतून कमी करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 6:05 pm

Web Title: volkswagen shed 30000 jobs cut costs scandal
Next Stories
1 नोटाबंदीच्या निर्णयामुळे मोदींच्या जिवाला धोका- रामदेव बाबा
2 ‘…म्हणून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना आयसीसीयूमध्ये ठेवले आहे’
3 नोटाबंदीविरोधातील याचिकांची सुनावणी स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
Just Now!
X