29 September 2020

News Flash

‘काळा पैसा परत आणण्याचे वचन देणाऱया पक्षालाच मत द्या’

परदेशी बॅंकातील काळा पैस परत आणण्याचे वचन देणाऱया राजकीय पक्षालाच मत द्या, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केले.

| January 27, 2014 05:09 am

परदेशी बॅंकातील काळा पैस परत आणण्याचे वचन देणाऱया राजकीय पक्षालाच मत द्या, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केले. ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभात बोलताना जेठमलानी यांनी हे आवाहन केले.
ते म्हणाले, नागरिकांनी राजकीय पक्षांकडून केवळ एकाच गोष्टीची मागणी केली पाहिजे. परदेशातील बॅंकांमध्ये ठेवण्यात आलेला काळा पैसा देशात परत आणण्याची मागणी नागरिकांनी राजकीय पक्षांकडे केली पाहिजे. राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात या आश्वासनाचा उल्लेख केला पाहिजे, असे जेठमलानी म्हणाले.
देशातील गरिबांना लुटून मोठ्या उद्योगपतींनी आणि राजकारण्यांनी हा पैसा परदेशामध्ये ठेवलाय. मात्र, तो परत आणण्यासंदर्भात सरकार मूग गिळून गप्प आहे, असाही आरोप जेठमलानी यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2014 5:09 am

Web Title: vote for those committed to bring back black moneyjethmalani
Next Stories
1 टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचा संशयास्पद मृत्यू
2 काँग्रेसमुळे अराजकता; नरेंद्र मोदीच देशाचे तारणहार- रामदेवबाबा
3 माशेलकर पद्मविभूषण, दाभोलकरांना पद्मश्री
Just Now!
X