पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत दिल्याने मुस्ली दलितांचा छळ सुरू करण्यात आला आहे असा गंभीर आरोप लेखक आणि ब्लॉगर विकास सारस्वत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काही बातम्या ट्विट केल्या आहेत. आपण म्हणतो आहोत ते कसे योग्य आहे हे त्या बातम्यांवरूनच पडताळा असंच सांगण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.

अमर उजालाच्या बातमीचा हवाला त्यांनी दिला आहे त्यात त्यांनी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या सहा समर्थकांना कशाप्रकारे इटवाह या ठिकाणी मारहाण करण्यात आली हे सांगितले आहे. जमावाने येऊन एका दलित कुटुंबावर हल्ला केला आणि घरातल्या स्त्री-पुरुषांना मारहाण केली. त्याचप्रमाणे प्रयागराज या ठिकाणी दुसऱ्या एका कुटुंबावर सपाला मतदान केलं नाही म्हणून हल्ला करण्यात आला आणि त्यांना मारहाण करण्यात आली याचंही उदाहरण त्यांनी दिलं आहे यासाठी त्यांनी न्यूज ट्रॅक लाइव्ह या वेबसाईटवरच्या बातमीचा हवाला दिला आहे.

यूपीचौपाल. कॉम नावाच्या स्थानिक वेबसाईटचा हवाला देऊन त्यांनी एका महिलेला कशी मारहाण करण्यात आली तेदेखील सांगितलं आहे. भाजपाला मत दिल्याने या महिलेला मारहाण करण्यात आली असं त्या बातमीत दिसतं आहे. तर पंजाब केसरीच्या वेबसाईटचा हवाला देत एका वृद्ध माणसाला कशी मारहाण करण्यात आली त्याचेही उदाहरण विकास सारस्वत यांनी ट्विट केलं आहे.

ही सगळी उदाहरणे देऊन भाजपाला मतं दिल्याने लोकांन काय काय सहन करावं लागलं त्याचं उदाहरण विकास सारस्वत यांनी दिलं आहे. आता याची दखल मोदी सरकार घेणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.