देशात पुन्हा आणीबाणी उद्भवण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केल्याने चर्चेत आलेले भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा मोदींचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे.
‘एकदा सत्तेत आल्यावर कोणाला ती गमवावीशी वाटत नाही, मात्र सत्तेचा दुरुपयोग केल्यास मतदार धडा शिकवेल,’ असे सूचक वक्तव्य अडवाणी यांनी केले आहे. एका दूरचित्रवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. मतदार राजाच्या हक्कांशी खेळू नका, अन्यथा मतदार धडा शिकवेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.