केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी, काँग्रेसचे पी. एल. पुनिया, राजबब्बर, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, भाजपचे नीरज शेखर यांच्यासह ११ राज्यसभा सदस्य २५ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेसाठी ९ नोहेंबर रोजी निवडणूक होईल.

सपचे पाच, भाजप व बसप, काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्यांच्या सहा वर्षांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे. सध्या ३९५ सदस्यसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडे मित्र पक्षांसह ३१८ मते आहेत. पहिल्या पसंतीची ३७ मते गरजेची आहेत. त्यामुळे भाजपचे किमान ८ उमेदवार राज्यसभेवर निवडून येऊ  शकतात. यात सर्वाधिक नुकसान सपचे होणार आहे. सपने रामगोपाल यादव यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. सपकडे ४८ जागा आहेत. काँग्रेसकडे केवळ सात मते आहेत. त्यामुळे काँग्रेसला स्वबळावर उमेदवार जिंकून आणणे कठीण आहे.

बिहारमध्ये २८ ऑक्टोबर, ३ व ७ नोव्हेंबर अशी तीन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होत आहे.  ३ नोव्हेंबर रोजी १० राज्यांतील ५४ विधानसभा जागांसाठीही पोटनिवडणूक होत आहे. जूनमध्ये १९ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक घेण्यात आली होती.