News Flash

लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या १४ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

१७ एप्रिल रोजी होणार मतदान; निवडणूक आयोगाने केली घोषणा

भारतीय निवडणूक आयोगाने आज (मंगळवार) लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या १४ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील लोकसभेच्या दोन जागा व विविध राज्यांमधील विधानसभेच्या १४ जागांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर या पोटनिवडणुकांची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.

आंध्र प्रदेशमधील २३- तिरुपती आणइ कर्नाटकमध्ये २- बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. तर, विधानसभा पोटनिडणूक होणार असलेल्या ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर, गुजरातमधील मोरवा हदफ, झारखंडमधील मधुपुर, कर्नाटकमधील बसवकल्याण व मसकी, मध्यप्रदेशातील दामोह, मिझोरममधील सेरछीप, नागालॅण्डमधील नोकसेन, ओदिशातील पीपली, राजस्थानमधील सहारा, सुजानगढ व राजसमंद, तेलंगणातील नागार्जुन सागर आणि उत्तराखंडमधील साल्त यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 7:07 pm

Web Title: voting for by polls to two parliamentary constituencies and 14 constituencies to be held on 17th april msr 87
Next Stories
1 काँग्रेसमधून बाहेर पडलेले पी. सी. चाको आठवड्याभरात राष्ट्रवादीत दाखल!
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सल्लागार पी.के.सिन्हा यांचा राजीनामा
3 रेल्वे खासगीकरण : “रस्ते राष्ट्रीय संपत्ती असूनही त्यावर खासगी गाड्या चालत ना?”; गोयल यांचा विरोधकांना सवाल
Just Now!
X